उपनिरीक्षकालाच अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी
By Admin | Published: October 29, 2016 02:03 AM2016-10-29T02:03:22+5:302016-10-29T02:03:22+5:30
हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी करीत असलेल्या तपासादरम्यान उपनिरीक्षकाला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी करीत असलेल्या तपासादरम्यान उपनिरीक्षकाला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी कासेवाडी झोपडपट्टीमध्ये घडली.
शाम राम चंदनशिवे (वय २९, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक व्ही. बी. चपाईतकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चपाईतकर यांच्याकडे एका बेपत्ता व्यक्तीचा तपास आहे. या तपासासाठी कासेवाडीमध्ये जाऊन नातेवाइकांकडे चौकशी करीत असताना आरोपीने त्यांना अपशब्द वापरले. आरडाओरडा करीत दलित समाजाचा मोर्चा आणून वर्दी उतरवतो, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. यामुळे चंदनशिवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)