कांद्यासाठी अनुदान देणारच - सुभाष देशमुख
By admin | Published: September 23, 2016 02:32 AM2016-09-23T02:32:02+5:302016-09-23T02:32:02+5:30
शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.
पुणे : शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले. शेतकऱ्यांबरोबर निर्यातदारांनादेखील निर्यातीसाठी प्रतिकिलो १० रुपये अनुदान देण्याचे प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
पणन मंडळाच्या संचालकांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले,की अनुदानासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठवावेत. सातबारा उतारा आणि बाजार समितीच्या आवारात कांदाविक्रीची पट्टी दिल्यास अनुदानापासून कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही. कांदा अनुदानासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून ५०-५० टक्के देण्याचा विचार आहे. यासाठीचा फेरप्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला आहे.