भुजबळांकडून भलतीच कागदपत्रे सादर

By admin | Published: August 23, 2015 01:58 AM2015-08-23T01:58:05+5:302015-08-23T01:58:05+5:30

महाराष्ट्र सदन आणि कलिना ग्रंथालय घोटाळा प्रकरणी लाचलुचपतविरोधी विभाग (एसीबी) आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत असले तरी इतर घोटाळ्यांशी संबंधित कागदपत्रे

Submission of documents by Bhujbal | भुजबळांकडून भलतीच कागदपत्रे सादर

भुजबळांकडून भलतीच कागदपत्रे सादर

Next

मुंबई : महाराष्ट्र सदन आणि कलिना ग्रंथालय घोटाळा प्रकरणी लाचलुचपतविरोधी विभाग (एसीबी) आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत असले तरी इतर घोटाळ्यांशी संबंधित कागदपत्रे छगन भुजबळ यांच्याकडून मिळविण्यात एसीबीला संघर्ष करावा लागत आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित अन्य आरोपांबाबत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यात संबंधित कागदपत्रे न देता भुजबळ नको ती कागदपत्रे देत आहेत, असे एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
नाशिकमध्ये बॉलीवूडमधील मंडळीच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाशी संबंधित कागदपत्रे मागितली असता भुजबळांनी या कार्यक्रमाचे पोस्टर्स आणि सीडी पाठविल्या, असे या अधिकाऱ्याने उदाहरण देत सांगितले.
जनहित याचिकेत करण्यात आलेल्या तक्रारींच्या चौकशीबाबत काय प्रगती झाली, असे विचारले असता या अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशी आणि तपास (अन्वेषण) यात फरक आहे. अन्वेषणात आम्ही आरोपीला कागदपत्रे सादर करण्यास सांगतो. ती मिळाली नाही, तर छापे टाकून ती मिळवितो. भुजबळ जी कागदपत्रे देत आहेत, ती चौकशीच्या दृष्टीने गैरलागू आहेत.
छगन भुजबळ पब्लिक वेल्फेअर फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने नाशिकमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाशी संबंधित कागदपत्रे मागितली असता त्यांनी पोस्टर्स आणि सीडी पाठविली.
अंजली दमानिया यांच्या जनहित याचिकेची दखल घेत हायकोर्टाने एसीबी आणि अंमलबजावणी संचालनालयाला भुजबळांविरुद्ध करण्यात आलेल्या ११ आरोपांच्या चौकशीसाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यापैकी दोन आरोप एकत्र केल्याने आरोपांची संख्या ९ झाली. नऊपैकी दोन प्रकरणांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


पब्लिक ट्रस्टच्या खात्यातून कलाकारांना मोबदला
भुजबळ यांनी २०१० आणि २०११ दरम्यान नाशिक महोत्सव आयोजित केला होता. त्यासाठी एका इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीला आणि कलाकारांना पब्लिक ट्रस्टच्या खात्यातून मोबादला दिला. सेलिना जेटली यांना ४.५ लाख, साधना यांना ३.६ लाख, डिनो मॉरिया यांना ४.५ लाख अािण लारा दत्ताला सर्वाधिक १६.२० लाख रुपये या महोत्सवात सहभागी झाल्याबद्दल मोजण्यात आले. याशिवाय गायक अभिजित सावंतला ४५ हजार, नेहा धुपियाला ४.९ लाख आणि सोनू निगमला ४.५ लाख रुपये देण्यात आले.

Web Title: Submission of documents by Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.