मालेगाव स्फोटाच्या तपासाचे कागदपत्र सादर करा

By admin | Published: October 15, 2016 03:23 AM2016-10-15T03:23:35+5:302016-10-15T03:23:35+5:30

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणात करण्यात आलेल्या तपासाची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राष्टीय तपास यंत्रणेला

Submit the document of Malegaon bomb blast case | मालेगाव स्फोटाच्या तपासाचे कागदपत्र सादर करा

मालेगाव स्फोटाच्या तपासाचे कागदपत्र सादर करा

Next

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणात करण्यात आलेल्या तपासाची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राष्टीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले.
या खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला एनआयएने क्लीनचीट देऊनही विशेष न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयाला साध्वीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या.नरेश पाटील व न्या.प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे या अर्जावर सुनावणी होती.
विशेष न्यायालयाने साध्वीचा दोनदा जामीन अर्ज फेटाळला. एनआयएने आधीचा निर्णय विचारात घेऊन दुसऱ्यांदा जामीन फेटाळला, असे साध्वीतर्फे ज्येष्ठ वकील अविनाश गुप्ता यांनी सांगितले.
‘तपास यंत्रणा क्लीन चीट देते त्यावेळी न्यायालयीन कामकाजाचे आणि तपासासंदर्भातील सर्व कागदपत्र बघावे लागतात,’ असे म्हणत खंडपीठाने एनआयएला सर्व कागदपत्रे १६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Submit the document of Malegaon bomb blast case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.