‘माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची कागदपत्रे सादर करा’

By Admin | Published: July 19, 2016 05:21 AM2016-07-19T05:21:20+5:302016-07-19T05:21:20+5:30

राज्यातील माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातील कागदपत्रे व जाहिराती सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले

Submit documents for appointment to Information Commissioner | ‘माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची कागदपत्रे सादर करा’

‘माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची कागदपत्रे सादर करा’

googlenewsNext


मुंबई : राज्यातील माहिती आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातील कागदपत्रे व जाहिराती सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. माहिती आयुक्तांच्या बदल्या करण्याचा अधिकार मुख्य माहिती आयुक्तांना नसल्याचा दावा करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
माहिती आयुक्तांच्या बदल्या करण्याचे अधिकार कोणाला आहेत, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी अधिकार नसतानाही अमरावती खंडपीठाचे माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांची नियुक्ती पुणे खंडपीठावर केली. आयोगाचा कारभार, संचलन व अन्य कामकाज पाहण्याची जबाबदारी मुख्य माहिती आयुक्तांची असली तरी कायद्यानुसार मुख्य माहिती आयुक्तांना माहिती आयुक्तांची बदली करण्याचे अधिकार नाहीत, असा दावा करणारी जनहित याचिका विजय कुंभार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी
२२ जुलै रोजी ठेवण्यात आली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Submit documents for appointment to Information Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.