मालेगाव प्रकरणी आरोपनिश्चितीचा मसुदा सादर
By admin | Published: July 26, 2016 01:02 AM2016-07-26T01:02:07+5:302016-07-26T01:02:07+5:30
मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या सहारंक बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) सोमवारी विशेष न्यायालयात आरोप निश्चितीचा मसुदा दाखल केला.
- साध्वी प्रज्ञाला वगळले
मुंबई : मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या सहारंक बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) सोमवारी विशेष न्यायालयात आरोप निश्चितीचा मसुदा दाखल केला. साध्वी प्रज्ञासिंग हिच्यासह सहाजणांना त्यातून वगळण्यात आले आहे.
२९ सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावात एका स्फोटात सहाजण ठार तर १०० जण जखमी झाले होते. याबाबत तत्कालिन एटीएसप्रमुख शहीद हेमंत करकरे यांनी शिताफीने तपास करुन यामध्ये हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आणले
होते.
या खटल्यातील साक्षीदारांनी आपल्या साक्षी फिरविल्याने एनआयएने साध्वी प्रज्ञासिंगसह सहा जणांना यापूर्वीच क्लिनचिट दिली आहे. सोमवारी त्यांच्यावतीने दाखल केलेल्या मसूद्यामध्ये भारतीय दंड विधान कलमान्वये (आयपीसी)शस्त्र बाळगणे,बेकायदेशीर कृत्य करणे आदी विविध १३ कलमांचा समावेश आहे. मात्र ‘मोक्का’चे कलम लावण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)