कालबद्ध कार्यक्रम सादर करा- हायकोर्ट
By admin | Published: November 1, 2015 02:03 AM2015-11-01T02:03:49+5:302015-11-01T02:03:49+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेली सुमारे ६६ हजार बेकायदेशीर बांधकामे कधी तोडणार? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भातील कालबद्ध
मुंबई : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेली सुमारे ६६ हजार बेकायदेशीर बांधकामे कधी तोडणार? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भातील कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचा आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत बेसुमार बेकायदेशीर बांधकामे झाली असून, यावर कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ज्योती डांगे यांनी दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.
६६ हजार बेकायदेशीर बांधकामांपैकी आतापर्यंत १,३४५ बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेने खंडपीठाला दिली. नवी मुंबई महापालिकेला बेकायदेशीर बांधकामे तोडण्याचे जो क्रम लावून दिला आहे, त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेनेही कारवाई करावी, असे म्हणत, खंडपीठाने महापालिकेला बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम दिवाळीच्या सुट्टीनंतर सादर करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)