मागण्यांबाबत अहवाल सादर करा
By admin | Published: March 16, 2016 08:37 AM2016-03-16T08:37:11+5:302016-03-16T08:37:11+5:30
सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय सफाई कामगार संघटनेने मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. त्याची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री दिलीप
मुंबई : सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय सफाई कामगार संघटनेने मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. त्याची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी संघटनेच्या मागण्यांबाबत प्रधान सचिव यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
संघटनेचे सरचिटणीस राजेश सोनवणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाला अध्यक्ष नेमण्याची मागणी संघटनेन ेकेली होती. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत २५ वर्षे सेवा केलेल्या सफाई कामगारांना किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबांना मालकी तत्त्वावर मोफत घर देण्याची मागणीही संघटनेने केली होती. त्याची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री यांनी सकारात्मक चर्चा केली. शिवाय प्रधान सचिव यांचा अहवाल मिळाल्यानंतर कार्यवाही करण्याचेही आश्वासन दिल्याचा दावा सोनवणे यांनी केला आहे. सफाई कामगारांच्या वारसांना शासन निर्णयानुसार ३० दिवसांच्या आत नियुक्ती न दिल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असेही संघटनेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)