उपराजधानी जलमय

By Admin | Published: July 24, 2014 01:03 AM2014-07-24T01:03:34+5:302014-07-24T01:03:34+5:30

उपराजधानीत बुधवारी पावसामुळे दाणादाण उडाली. खोलगट परिसरातील वस्त्या, झोपडपट्ट्यांसह पॉश भागांमधील नाल्या तुंबल्या. यामुळे अनेक परिसराला तलावाचे स्वरूप आले.

Subordinate water | उपराजधानी जलमय

उपराजधानी जलमय

googlenewsNext

सखल भागात साचले पाणी- जनजीवन विस्कळीत
नागपूर : उपराजधानीत बुधवारी पावसामुळे दाणादाण उडाली. खोलगट परिसरातील वस्त्या, झोपडपट्ट्यांसह पॉश भागांमधील नाल्या तुंबल्या. यामुळे अनेक परिसराला तलावाचे स्वरूप आले. बहुसंख्य सर्वच चौकातील रस्ते पाण्याखाली गेले. सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. महापालिकेचा पावसापूर्वीचे नियोजनाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. लोकमत चमूने ‘आॅन दि स्पॉट’ जाऊन वस्त्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे वर्षानुवर्षांपासूनच्या समस्या आजही कायम असल्याचे पहायला मिळाले. शासकीय मदतीची वाट पाहून हताश झालेल्या नागरिकांची या परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरू असलेली धडपड पहायला मिळाली. तीन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे गृहिणींची पंचाईत झाली. पश्चिम नागपुरातील अनेक भागात भाजीविक्रेते आले नसल्यामुळे भाजी, फळे घेण्यासाठी भटकंती करावी लागली. शिवाय पावसामुळे दरदेखील वाढले असल्यामुळे मिळेल त्या दरात खरेदी करावी लागली.
बेसा भागातील नाल्याला पूर आल्याने या भागातील अनेक वस्त्यांत पाणी तुंबले होते. चिंतामणीनगर येथे अनेकांची दुचाकी वाहने पाण्यात बुडाली होती. मंगळवारीसुद्धा बेसा भागातील अनेक वस्त्यांत २ ते ३ फूट पाणी साचले होते. सलग दोन दिवसांपासून काही वस्त्यांत पाणी साचले असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
लकडगंज भागातील भोजवानी यांच्या घरात पाणी शिरले होते. हिंगणा नाक्याजवळ पाणी तुंबले होते. नारी रोड येथे पाणी तुंबले होते. पावसाळी नाल्यामध्ये गाळ व कचरा साचल्याने अनेक ठिकाणी पाणी तुबले होते. पाच मंदिर शाहू मोहल्ला येथे सलग दुसऱ्या दिवशी घरात पाणी शिरले होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी पंप लावून पाणी काढले.
पांडे ले-आऊ ट येथील अथर्व अपार्टमेंटमधील प्लॉट क्र. ५२ येथे झाड पडले. जलालपुरा भागात पोलीस स्टेशनच्या बाजूला, जयस्तंभ चौक, श्रीकृष्णनगर, तुळशीबाग भागातील सी.पी. अ‍ॅन्ड बेरार कॉलेज, रविभवन, सी.पी. क्लब, जीपीओ चौकातील सुयोग बिल्डिंग, माताकचेरी, त्रिमूर्तिनगर मैदानाजवळ, चिटणीस पार्क, अलंकार टॉकीज, गांधीबाग भागातील अग्रसेन चौक, इंदोरा बाराखोली बुद्धविहार, गोरेवाडा रोड, बिडीपेठ येथील माडे किराणा स्टोर्सजवळ, म्हाळगीनगर येथील धोडगे शाळेजवळ, हसनबाग भागातील मोठी मशीद, गंगाबाई घाट रोड, क्वेटा कॉलनी, गणेशपेठ पोलीस क्वॉर्टर, गोधनी रोडवरील गिरड अपार्टमेंट सोसायटी, शंकरनगर मेनरोडवरील पाटील यांच्या घराजवळ, दीपकनगर येथील खोब्रागडे यांच्या घराजवळ, पोलीस लाईन टाकळी येथील कुवतनगर, लेडीज क्लब, सिव्हिल लाईन भागातील आयडीबीआय बँकेजवळ, लेडीज क्लबच्या बाजूला, टी.बी. वॉर्डच्या बाजूला, सिव्हिल लाईन भागातील शासकीय दूध डेअरी, एलआयसी चौक, देशपांडे सभागृह आदी १८० ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.
थोड्याच वेळात अग्निशमन विभागाकडे झाडे पडल्याचे कॉल्स आल्याने विभागाच्या जवानांची चांगलीच तारांबळ उडाली. वाहतूक विस्कळीत झालेल्या मार्गावरील झाडे प्राधान्याने हटविण्यात आली. (प्रतिनिधी)
संघर्षनगरात पाणी शिरले
उत्तर नागपुरातील नाल्यावरील पुलाची स्लॅब कोसळल्याने संघर्षनगरातील घरात पाणी शिरले. बुधवारी पावसाचा जोर ओसरला नसता तर ही वस्ती पाण्याखाली जाण्याचा धोका होता. वस्तीतील नागरिक गेल्या दीड वर्षांपासून पूल दुरुस्तीची मागणी करीत आहेत. परंतु महापालिकेच्या बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. नादुरुस्त पूल कोसळल्याने नाल्यातील पाणी वस्तीत शिरल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती. लोकांनी येथे गर्दी केली होती. घरात पाणी शिरण्याला मनपा प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप रिजवान हसन यांनी केला आहे. लोक ांचा रोष लक्षात घेता मनपा प्रशासन तातडीने कामाला लागले आहे. रिजवान हसन, सगीर अन्सारी, शहाबुद्दीनभाई, सलामभाई, मधुसूदन गवई यांच्यासह मोठ्या संख्येने वस्तीतील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Subordinate water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.