सुब्रमण्यम स्वामी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

By admin | Published: August 16, 2016 08:06 PM2016-08-16T20:06:22+5:302016-08-16T20:28:22+5:30

भाजपाचे नेते व खासदार डॉ.सुब्रम्हण्यम स्वामी यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली

Subramaniam Swamy's visit to Sarsanghchalak | सुब्रमण्यम स्वामी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

सुब्रमण्यम स्वामी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - भाजपाचे नेते व खासदार डॉ.सुब्रम्हण्यम् स्वामी यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास ते संघ मुख्यालयात होते व २० मिनिटे सरसंघचालकांशी चर्चा केली. चर्चा झाल्यावर लगेच डॉ.स्वामी विमानतळाकडे रवाना झाले. एरवी ते प्रत्येक वेळी प्रसारमाध्यमांशी मोकळा संवाद साधतात. परंतु मंगळवारी मात्र ते काहीही न बोलता निघून गेले. स्वामी यांचा नागपूर दौरा गुप्त ठेवण्याचा प्रयत्न ठेवण्यात आला होता. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकले नाही. परंतु स्वामी यांनी गेले काही दिवसांपासून मौन साधले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ.रघुराम राजन यांच्यावर स्वामी यांनी टीकेची झोड उठवली होती. परंतु नरेंद्र मोदी यांनी, राजन यांची देशभक्ती कुणाहूनही कमी नाही, असे म्हणत स्वामी यांना टोला लगावला होता. यानंतर डॉ.स्वामी यांनी वादग्रस्त वक्तव्ये दिलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर डॉ.स्वामी व सरसंघचालक या भेटीला जास्त महत्त्व आले आहे.

Web Title: Subramaniam Swamy's visit to Sarsanghchalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.