के. सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती
By admin | Published: July 2, 2016 05:12 AM2016-07-02T05:12:55+5:302016-07-02T05:12:55+5:30
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या संचालकपदी प्रोफेसर के. सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : टाटा मूलभूत संशोधन केंद्र (टीआयएफआर) संचलित होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या संचालकपदी प्रोफेसर के. सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुब्रह्मण्यम यांनी शुक्रवारी (१ जुलै) संचालकपदाची सूत्रे हाती घेतली.
आयआयटी मुंबईमधून प्रोफेसर सुब्रह्मण्यम यांनी १९९२ साली तत्त्वज्ञानात पीएच.डी. केलेली आहे. आयआयटी मद्रास येथून त्यांनी एरोनॉटिकल अभियांत्रिकी शाखेत पदवीही संपादन केली आहे; शिवाय हेमचंद्र चिंतामणी प्रधान यांच्यासोबत त्यांनी गणिती क्षेत्रात योगदान दिलेले आहे.
मॅथमॅटिक्स आॅलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांनादेखील त्यांनी मार्गदर्शन केले होते. विज्ञान आणि गणित हे त्यांचे अभ्यासाचे तसेच चिंतनाचे विषय आहेत. या दोन्ही विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. शालेय स्तरावर गणित, विज्ञान विषयात विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी साहित्यनिर्मितीदेखील केलेली आहे. (प्रतिनिधी)