दूध भुकटीसाठी अनुदान, राज्य शासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:19 AM2018-07-11T05:19:09+5:302018-07-11T05:19:22+5:30
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दूध भुकटी निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपूर - दूध भुकटीची निर्यात करणाऱ्या उत्पादकांना प्रति किलो ५० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल तसेच दूध निर्यात करणा-यांनाही प्रति लीटर ५ रुपये प्रोत्साहनपर अनुदान पुढच्या दोन महिन्यांसाठी देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. तशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दूध भुकटी निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच दुधाच्या उपपदार्थांना अधिक मागणी येण्याच्या दृष्टीने तूप आणि लोणी यावरील जीएसटी कमी करण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीस मंत्री जानकर यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, सदाभाऊ खोत यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, शरद रणपिसे, गणपतराव देशमुख, राजेश टोपे, मधुकर चव्हाण, हसन मुश्रीफ, सुरेश धस, चंद्रदीप नरके, राहुल मोटे, सत्यजीत पाटील, मनोहर भोईर, मंदाकिनी खडसे आणि महानंदचे अध्यक्ष उपस्थित होते.
पोषण आहारातही दूध व दूध भुकटीचा समावेश
उपरोक्त निर्णयासोबतच शालेय शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभाग या विभागांमार्फत राबविण्यात येणाºया विविध पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे जानकर यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात पावडर
देशात शिल्लक पावडर ३.५०लाख
टन
‘अमूल’कडे शिल्लक ६० हजार
टन
‘गोकूळ’कडे शिल्लक ७ हजार
टन
आंतरराष्टÑीय पातळीवर ११५ रुपये
पावडरचे दर प्रतिकिलो
सरकारचे निर्यात ५० रुपये
अनुदान प्रतिकिलो
पावडर निर्यात
अनुदानाचे गणित
पावडरचा उत्पादन खर्च १६० रुपये
प्रतिकिलो
देशांतर्गत पावडर दर १२५ रुपये
प्रतिकिलो
आंतरराष्टÑीय पातळीवर ११५ रुपये
प्रतिकिलो
सरकारचे अनुदान ५० रुपये