अपंग शेतकऱ्याचे यशस्वी उत्पादन
By admin | Published: June 10, 2016 01:28 AM2016-06-10T01:28:26+5:302016-06-10T01:28:26+5:30
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील अपंग शेतकरी देविदास बबन शिंदे यांनी दुधी भोपळ्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे
अवसरी : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील अपंग शेतकरी देविदास बबन शिंदे यांनी दुधी भोपळ्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे
अवसरी खुर्द बसस्थानकानजीक देविदास बबन शिंदे यांची १९ गुंठे शेतजमीन आहे. तेथे कोथिंबिरीचे यशस्वी उत्पादन घेतले. त्यानंतर मांडव उभा करून दुधी भोपळ्याचे उत्पादन घेतले. १९ गुंठ्यातील दुधी भोपळ्याला बी, खते, औषधे असा खर्च ३५ हजार रुपये झाला आहे.
दुधी भोपळ्याला मंचर, एकलहरे येथील मॉलमध्ये २० ते २५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. भोपळ्याचे उत्पन्न आणि बाजारभावाची साथ मिळाल्याने गेल्या महिन्यात सुमारे ६० हजार रुपये भोपळा पिकातून खर्च वजा जाता मिळाले आहेत. सुमारे दोन महिने भोपळा पिकाचे उत्पन्न मिळणार असून, बाजारभावाची साथ मिळत आहे.
वेळेवर औषध फवारणी, खते दिली जात असल्याचे देविदास शिंदे यांनी सांगितले. वरज जातीच्या भोपळ्याचे उत्पादन चांगले निघत असून, बाजारभाव चागंला मिळत आहे.
(वार्ताहर)