ग्रामीण भागातील महिलांनी केली २३ कोटींच्या कर्जाची यशस्वी परतफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2016 08:43 AM2016-10-01T08:43:33+5:302016-10-01T08:43:48+5:30

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी अतिशय प्रामाणिकपणे बँकांच्या २३ कोटी रुपयांच्या कर्जाची यशस्वीरीत्या परतफेड केली

Successful reimbursement of 23 crore loan from women in rural areas | ग्रामीण भागातील महिलांनी केली २३ कोटींच्या कर्जाची यशस्वी परतफेड

ग्रामीण भागातील महिलांनी केली २३ कोटींच्या कर्जाची यशस्वी परतफेड

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १ -  धनधांडग्यांकडून बँकेचे कर्जरुपात घेतलेले पैसे बुडविण्याचे प्रकार घडत असताना, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी अतिशय प्रामाणिकपणे बँकांच्या २३ कोटी रुपयांच्या कर्जाची यशस्वीरीत्या परतफेड केली. ग्रामीण विकास यंत्रणेच्या पाठबळामुळे जिल्ह्यातील महिला बचतगटांना आत्मनिर्भर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कर्जातून त्यांनी आपल्या व्यवसायाला बळकट करीत, बचतगटांच्या खात्यात लाखो रुपयांची सेव्हिंग केले. शासनाच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील महिलाही आता उद्योगाच्या प्रवाहात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक व सामाजिक प्रगती साधण्यासाठी शासनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचत गटांना पाठबळ मिळाल्याने नागपूर जिल्ह्यातील शेकडो महिला बचत गट उद्योगाच्या प्रवाहात आले आहे. यातील काही महिला बचतगटांची वार्षिक उलाढाल दहा लाखावर पोहचली आहे. लोणचे, पापड, तिखट, मसाले या वस्तूंना मागे टाकून बचत गटांनी सॅनिटरी नॅपकीन, मत्स्यपालन, फुलशेती यातही आपले पाय रोवले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात बचत गटांनी २३ कोटी रुपयांचे कर्जाची यशस्वीरीत्या परतफेड केली आहे. बचत गटांचे यश लक्षात घेता यावर्षी शासनाने ३१.७४ कोटी रुपयांचे महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे टार्गेट जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले आहे. महिला बचत गट ही केवळ योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १८६४ महिला बचत गट आहे. बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो बँकिंग मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. कौटुंबिक गरजा, अडीअडचणी सोडविण्याकरिता बचत गटाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येतो. परंतु काही बचत गटांना ग्रामीण विकास यंत्रणेने दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे बचतगट व्यवसायाकडे वळले आहेत.
- केवळ पैशांची बचत करणे एवढेच बचत गटाचे उद्दिष्ट नसून त्यांच्या हातांना काम मिळवून देणे आणि स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. ग्रामीण विकास यंत्रणेचे त्यांना पाठबळ मिळाल्यामुळे या महिला आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत.
मकरंद नेटके, प्रकल्प अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

Web Title: Successful reimbursement of 23 crore loan from women in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.