वॉचडॉग फाउंडेशनचा असाही लढा
By admin | Published: April 22, 2015 04:22 AM2015-04-22T04:22:07+5:302015-04-22T04:22:07+5:30
पालिकेच्या विकास आराखड्याचा सखोल अभ्यास करून या आराखड्याविरुद्ध अंधेरी (पूर्व) मरोळ येथील वॉचडॉग फाउंडेशनने जोरदार लढा दिला.
मनोहर कुंभेजकर, मुंबई
पालिकेच्या विकास आराखड्याचा सखोल अभ्यास करून या आराखड्याविरुद्ध अंधेरी (पूर्व) मरोळ येथील वॉचडॉग फाउंडेशनने जोरदार लढा दिला. या संस्थेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरांत जनआंदोलन उभे राहिले. या आराखड्यात अनेक चुका असल्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णयदेखील संस्थेने घेतला होता, अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी दिली.
‘लोकमत’ने सर्वप्रथम ‘विकास आराखडा का ओरखडा?’या मथळ््याखालील विकास आराखड्यातील विविध चुकांवर आवाज उठवला. ‘विकास आराखड्यात धर्मस्थळांवर संक्रांत’ या मथळ््याखालील ‘लोकमत’च्या ५ एप्रिलच्या वृत्ताची सरकारला दखल घ्यावी लागली. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विकास आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा केली होती. त्यानंतर आता विकास आराखडाच रद्द झाला आहे. वॉचडॉग फाउंडेशनच्या या लढ्यात ‘लोकमत’चे मोठे श्रेय असल्याची प्रतिक्रि या गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी व्यक्त केली. वर्सोव्याच्या आमदार डॉ़ भारती लव्हेकर आणि सामाजिक समता मंचचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी देखील हा विकास आराखडा सर्वसमावेशक नसून त्यात अनेक चुका असल्यामुळे तो अरबी समुद्रात बुडवण्याची मागणी केली होती.