मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये अचानक वाढ
By Admin | Published: June 12, 2017 05:54 PM2017-06-12T17:54:46+5:302017-06-12T17:54:46+5:30
मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. मेट्रो वनकडून आज यासंदर्भातील घोषणा करण्यात आली.
मुंबई मेट्रोने परतीच्या प्रवासाच्या टोकन आणि ट्रिप पासच्या दरात वाढ केली आहे. तिकीटात पाच रुपयांनी वाढ केली आहे. 2 ते 5 किमी टप्प्यातील प्रवासाच्या तिकीटात 1 रुपया 66 पैसे, तर 5 ते 8 किमी प्रवासाच्या तिकीटात 3 रुपये 33 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.यापूर्वी ट्रिप पासवरील डिस्काऊंट 50 टक्के होते. आता 8 किलोमीटरचा एक टप्पा याप्रमाणे मेट्रोच्या भाड्याची पुनर्रचना करण्यात आली आहे.
सध्या दररोज सुमारे अडीच ते तीन लाख मुंबईकर मेट्रोने प्रवास करतात. या प्रवाशांना आता तिकीट दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.