जायचे होते दिल्लीला, फडणवीस पोहोचले अयोध्येला; अचानक ठरले, शिंदेंनीच लखनऊमध्ये सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 09:35 AM2023-04-09T09:35:28+5:302023-04-09T09:40:55+5:30

एकनाथ शिंदे यांनी लखनऊ विमानतळावर पोहोचताच देवेंद्र फडणवीस अयोध्येसाठी निघाले असल्याचे म्हटले आहे. फडणवीस लखनऊला पोहोचले देखील असणार आहेत. 

Suddenly decided! Devendra Fadnavis also left for Ayodhya; Eknath Shinde himself said in Lucknow tour | जायचे होते दिल्लीला, फडणवीस पोहोचले अयोध्येला; अचानक ठरले, शिंदेंनीच लखनऊमध्ये सांगितले

जायचे होते दिल्लीला, फडणवीस पोहोचले अयोध्येला; अचानक ठरले, शिंदेंनीच लखनऊमध्ये सांगितले

googlenewsNext

शिवसेना शिंदे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात अयोध्येला गेला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चार शिलेदार त्यांच्यासोबत होते. परंतू, शिंदे आणि आमदारा, मंत्री लखनऊमध्ये पोहोचताच एकनाथ शिंदेंनी उद्या देवेंद्र फडणवीस देखील येत असल्याचे सांगितले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

एकीकडे अजित पवार काही तास नॉट रिचेबल असल्याची वृत्ते येत होती. दुसरीकडे शिंदे आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जात होते. फडणवीस राज्यातच होते. असे चित्र असताना फडणवीसही अयोध्येला जाणार असल्याच्या अचानक आलेल्या माहितीने आश्चर्य वाटले. 

फडणवीस हे आज दुपारी १२ वाजता अयोध्येला आरतीला उपस्थित राहणार आहेत. यानंतर साडेचार वाजता मंदिराच्या निर्माण कार्याचाही आढावा घेणार असल्याचे समजत आहे. त्यांच्यासोबत आणखी काही भाजपाचे मंत्री जाणार आहेत. फडणवीस यांना आज दिल्लीला जायचे आहे. तिथे त्यांना एका बैठकीला उपस्थित रहायचे आहे. यामुळे ते दिल्लीला जाताना अयोध्येवरून जाणार आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी लखनऊ विमानतळावर पोहोचताच देवेंद्र फडणवीस अयोध्येसाठी निघाले असल्याचे म्हटले आहे. फडणवीस लखनऊला पोहोचले देखील असणार आहेत. 

शिंदे-फडणवीस यांच्यासह मंत्री, आमदार, खासदारांचा मुक्काम असलेल्या अयोध्येतील पंचशील हॉटेलला फुलांनी सजवण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हॉटेलबाहेर होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या जनसंपर्क विभागाने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी होर्डिंग्ज लावले आहेत.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा...


सकाळी ११.१५ वा.
लखनऊ येथून अयोध्या येथे आगमन

दुपारी १२.०० वा. 
प्रभू श्रीराम मंदिर, अयोध्या येथे महाआरती

दुपारी १२.३० वा.
प्रभू श्रीराम मंदिर परिसरातील बांधकामाची पाहणी

दुपारी ०२.३० वा.
पत्रकार परिषद
● स्थळ:- हॉटेल पंचशील , अयोध्या

दुपारी ०३.३० वा.
संत महंतांची भेट
● स्थळ:- लक्ष्मण किल्ला , अयोध्या

सायं. ०६.०० वा.
शरयू नदी महाआरती
● स्थळ:- शरयू घाट, अयोध्या

Web Title: Suddenly decided! Devendra Fadnavis also left for Ayodhya; Eknath Shinde himself said in Lucknow tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.