'देव करो अन् तुम्हाला निवडणूक चिन्ह खंजीरच मिळो', सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:55 PM2022-07-26T22:55:22+5:302022-07-26T22:57:11+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवला.

Sudhir Mungantiwar advice to Uddhav Thackeray they should get election symbol khanjir | 'देव करो अन् तुम्हाला निवडणूक चिन्ह खंजीरच मिळो', सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

'देव करो अन् तुम्हाला निवडणूक चिन्ह खंजीरच मिळो', सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

Next

मुंबई-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. तसंच भाजप नेत्यांवरही टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देव करो आणि उद्धव ठाकरेंना खंजीरच निवडणूक चिन्ह मिळो, असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. 

सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओतून मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा समाचार घेतला आहे. "असंख्य सूड घेण्याचे प्रकार पाहिले. एक मोठा नेता सरकारी वकिलासोबत मॅच फिक्सिंग करुन षडयंत्र करत होता. भाजपाच्या नेत्यांना अटक कशी करता येईल यासाठी कपोलकल्पीत कथा सुरू केल्या. याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत रेकॉर्डिंग देऊन केलं. तुमच्या मनात भीती होती म्हणून सीबीआयला बंदी टाकली. आज ज्या आमदारांनी भगवा हाती घेतला त्यांच्यावर टीका करायची हा सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहे", असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

"आमची पार्टी गुंडांची पार्टी, डॉक्टरपेक्षा कम्पाऊंड बरा, पाप केल्यानं कोरोना होतो, भाजपा जिंकली पण विजयी झाली नाही या राज्यामध्ये आपण काय भाषा करतो आहे. काय बोलतो आहे याचा जरा विचार व्हायला हवा होता. यावरच खरंतर मुलाखत व्हायला हवी होती. आजही तुम्हाला तुमची चूक मान्य नाही. तुम्ही येता जाता खंजीर, खंजीर खंजीर या शब्दाचा उपयोग करता देव करो आणि पुढचं बोधचिन्ह तुम्हाला खंजीरच मिळो", असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

Web Title: Sudhir Mungantiwar advice to Uddhav Thackeray they should get election symbol khanjir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.