“भाजपात येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, परंतु, देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय की...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 04:16 PM2023-08-05T16:16:48+5:302023-08-05T16:20:19+5:30

शरद पवारांना अजून BJP समजलीच नाही, असे सांगत भाजप नेत्यांनी टीका केली आहे.

sudhir mungantiwar claims that many leaders are lining up to join bjp | “भाजपात येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, परंतु, देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय की...”

“भाजपात येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, परंतु, देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय की...”

googlenewsNext

Sudhir Mungantiwar: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी केल्यानंतर वर्षभरातच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत सत्तेत सहभागी झाले. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. आणखी आमदार गटात येणार असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. यातच आता भाजपमध्ये येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, असा दावा भाजप नेत्याने केला आहे.

भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी बोलणे झाले आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावे की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे खुले आव्हान देत, भाजपमध्ये येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत. भारतीय जनता पक्षात येण्यासाठी रांग लागली आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

शरद पवारांना अजून भाजप समजलीच नाही

शरद पवार यांना परिवारवादाची ती व्याख्या वाटत असेल पण आम्हाला तो परिवादच वाटतो. १०५ आमदार जरी असले तरी ४३ मंत्री होणार आहेत. तुम्हाला भाजप अजून समजलीच नाही, असे म्हणत शरद पवार यांच्या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. तसेच आपला देश अर्थव्यवस्थेत प्रगती करत आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे. जर्मनी आणि जपान हे दोन्ही देश आपल्यामागे जाऊ शकतात. यामध्ये राज्याचा वाटाही खूप मोठा आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांनी फक्त घोषणा केली. मात्र महायुतीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत. हे खरे आहे की, काही शेतकऱ्यांना अजून मदत मिळणे बाकी आहे. पण आम्ही ती लवकरच देऊ. सगळे राज्य चालवायचे आहे. त्याचे आर्थिक गणित आहे, असे मुनगंटीवार  म्हणाले.


 

Web Title: sudhir mungantiwar claims that many leaders are lining up to join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.