राज्यातील सर्वोत्तम संकिर्तण सभागृह पंढरीत साकारणार - सुधीर मुनगंटीवार

By admin | Published: May 4, 2016 04:40 PM2016-05-04T16:40:36+5:302016-05-04T16:40:36+5:30

पंढरपूरकरांनी फक्त जमिन उपलब्ध करुन द्यावी त्यावर आम्ही राज्यातील सर्वोत्तम संकिर्तन सभागृह बांधू ही रुक्मिणी मातेच्या माहेरून आलेल्या माणसांची भेट असेल

Sudhir Mungantiwar, who will be the best ambassador in the state, will be in the house | राज्यातील सर्वोत्तम संकिर्तण सभागृह पंढरीत साकारणार - सुधीर मुनगंटीवार

राज्यातील सर्वोत्तम संकिर्तण सभागृह पंढरीत साकारणार - सुधीर मुनगंटीवार

Next

पंढरपूर : पंढरपूरकरांनी फक्त जमिन उपलब्ध करुन द्यावी त्यावर आम्ही राज्यातील सर्वोत्तम संकिर्तन सभागृह बांधू ही रुक्मिणी मातेच्या माहेरून (विदर्भ) आलेल्या माणसांची भेट असेल असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पंढरपूर अर्बन बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे होते. यावेळी मंचावर आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार सुधाकरपंत परिचाक, संजय दोड्डे, श्रीकांत भारतीय, नगराध्यक्षा साधना भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, दिनकर मोरे, वसंत मोरे आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले की, नव्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत बँकेचे महत्व प्रचंड आहे. ते ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाचे बँकेत अकाऊंट असण्याची योजना काढली होती. त्यानुसार राज्यात गेल्या वर्षी एक कोटी ३५ लाखांपेक्षा जास्त नवीन खाते काढण्यात आले आहेत. सध्या सहकार क्षेत्र चालवणे खूप कठीण आहे मात्र परिचारकांनी या सहकारी बँकेत क्रांती करुन दाखविली आहे. त्यामुळे त्यांचे मोठे कौतुक आहे.
१८३२ मध्ये मेकॅली यांनी म्हटले होत भारताची अर्थव्यवस्थाच भविष्यात अशी होईल की येथे व्यवसाय करणारे कमी आणि नोकरी मागणारे जास्त होतील आज तशीच अर्थव्यवस्था तयार झाली आहे असे चित्र दिसते. ते चित्र बदलण्यासाठी तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरु करता यावा यासाठी मुद्रा बँकेच्या वतीने तरुणांना आम्ही अर्थसहाय्य करत आहोत त्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय आम्ही नियंत्रण समित्या स्थापन करीत आहोत. त्यामुळे तरुणांना अर्थसहाय्य मिळाले की ते केवळ स्वत:च्या पायावर उभा राहणार नाहीत तर एकलव्याप्रमाणे त्यांच्या गुणवत्तेवर ते त्यांचे ध्येय गाठू शकतील.
तुमच्या मुळे पांडुरंग आमच्याकडे आला
प्रास्ताविक करताना आमदार प्रशांत परिचारक मुनगंटीवारांना म्हणाले की, रुक्मिणीमातेचे माहेर विदर्भ आहे. रुक्मिणी माता तेथून पंढरीत आल्या त्या पाठोपाठ विठ्ठल येथे आले जर रुक्मिणी माता येथे आल्या नसत्या तर विठ्ठलही आले नसते. तुम्ही रुक्मिणीमातेच्या माहेरची माणसे आहात त्यामुळे रुक्मिणी मातेचे आणि तुम्हा विदर्भातील माणसांचे आभार की त्यांच्यामुळे आज पंढपूरात देव आहे. त्यामुळे आता माहेरची माणसांकडून या पंढरपूरच्या विकास कामांना अधिक प्राधान्य द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
राईट पर्सन इन राँग पार्टी
मुनगंटीवार यांनी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा भाषणात उल्लेख करताना संत आमदार असा केला. ते म्हणाले बऱ्याचवेळा राईट पर्सन इन राँग पार्टी असे होते हे आम्हाला सुधाकरपंत परिचारकाबद्दल वाटत होते त्यामुळे त्यांंच्यासोबत सभागृहात काम करताना ते वगेळ््या पक्षात असतानाही आम्ही अनेकजण त्यांचे मार्गदर्शन घेत होतो. मात्र आता त्यांचा वारसा पुढे समर्थपणे प्रशांत परिचारक सांभाळत आहे.

Web Title: Sudhir Mungantiwar, who will be the best ambassador in the state, will be in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.