कऱ्हाड येथे स्थानिक जमावाची परप्रांतीयांना बेदम मारहाण

By admin | Published: July 17, 2017 02:01 AM2017-07-17T02:01:08+5:302017-07-17T02:01:08+5:30

व्यवसायासाठी कऱ्हाडात आलेल्या दोन परप्रांतीयांना २० ते २५ जणांच्या जमावाने लोखंडी गजाने मारहाण केली.

Suffering the parasites of the local people at Karhad | कऱ्हाड येथे स्थानिक जमावाची परप्रांतीयांना बेदम मारहाण

कऱ्हाड येथे स्थानिक जमावाची परप्रांतीयांना बेदम मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड (जि.सातारा) : व्यवसायासाठी कऱ्हाडात आलेल्या दोन परप्रांतीयांना २० ते २५ जणांच्या जमावाने लोखंडी गजाने मारहाण केली. शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या शिवसृष्टी लॉजमध्ये रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
कऱ्हाड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सोयब इनयेत उल्ला (२८) व समीम वजीर हमद (५५, मूळ रा. कसबा, जि. सामली, उत्तरप्रदेश) हे जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेश येथून १० ते १२ व्यापारी दरवर्षी कापड विक्रीच्या निमित्ताने कऱ्हाडला येतात. वर्षातून चार ते पाचवेळा पंधरा ते वीस दिवसांसाठी त्यांचे कऱ्हाडला येणे-जाणे असते. त्यांचा नेहमी दत्त चौकातील शिवसृष्टी लॉजमध्ये मुक्काम असतो. सर्वजण आजूबाजूच्या गावांमध्ये फिरून कपडे विक्रीचा व्यवसाय करतात.
रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते सर्वजण लॉजमधील रूममध्ये थांबले असताना दारू पिऊन आलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. काहींनी समीम हमद यांच्या हातातील मोबाईल घेत शिवीगाळ व दमदाटी केली. हमद यांनी त्यांना जाण्यास सांगितले. मात्र, काही वेळात पुन्हा २० ते २५ जणांची टोळकी तेथे आली. त्यांनी रूममधील साहित्य व दोन मोबाईल फोडले.

Web Title: Suffering the parasites of the local people at Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.