पत्नी, मुलांमुळे आरोपीच्या शिक्षेत सूट
By admin | Published: February 1, 2016 03:02 AM2016-02-01T03:02:27+5:302016-02-01T03:02:27+5:30
मित्राच्या पत्नीच्या विनयभंगप्रकरणी एका आरोपीला त्याची पत्नी व मुलांमुळे शिक्षेत एक वर्षाची सूट मिळाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला.
नागपूर : मित्राच्या पत्नीच्या विनयभंगप्रकरणी एका आरोपीला त्याची पत्नी व मुलांमुळे शिक्षेत एक वर्षाची सूट मिळाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला. भद्रावती (चंद्रपूर) येथील ही घटना आहे.
संतोषपुरी सरमानपुरी गोस्वामी (३८) हा मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. मित्र बाहेर असताना
तो त्याच्या घरी गेला आणि
त्याच्या पत्नीचा विनयभंग केला. पत्नीने विरोध केल्यानंतर तिला जखमी केले.
वरोरा सत्र न्यायालयाने हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपात संतोषपुरीला ७ वर्षे सश्रम कारावास तर विनयभंगाअंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास तर घरात अवैध प्रवेशांतर्गत एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते.
संतोषपुरीला सात वर्षे कारावासाची शिक्षा होती. संतोषपुरी १५ जून २०१२ पासून कारागृहात आहे. त्याला पत्नी व मुले आहेत. यासह विविध बाबी लक्षात घेता उच्च न्यायालयाने आरोपीचे अपील अंशत: मंजूर करून कमाल कारावास एक वर्षाने कमी केला. (प्रतिनिधी)