साखर स्वस्त!
By Admin | Published: July 31, 2015 10:44 PM2015-07-31T22:44:28+5:302015-07-31T22:44:28+5:30
दीड महिन्यात साखरेचे भाव प्रतिक्विंटल तब्बल सहाशे रुपयांपर्यंत घसरले.
अनिल गवई/ खामगाव (बुलडाणा): गेल्या दीड महिन्यात साखरेचे भाव प्रतिक्विंटल तब्बल सहाशे रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. साखरेच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत असून, हीच परिस्थिती राहिल्यास नजिकच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये मिष्ठान्न काहीसे स्वस्त होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात ३0-३२ रुपये किलोने साखर विकली गेली. जुलै महिन्याच्या अखेरीस यामध्ये आठ ते दहा रुपयांची घसरण झाल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.
*साबुदाण्यातही घसरण!
गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत साबुदाण्याच्या भावातही कमालीची घसरण झाली आहे. साबुदाण्याचे भाव ९0 रुपये किलोहून ५१-५५ रुपयांवर स्थिरावले आहेत.
कालावधी साखरेचे घाऊक दर(रु) किरकोळ विक्रीचे दर(रु) (प्रति क्विंटल) (प्रति किलो)
जूनचा शेवटचा आठवडा २६00-२७00 ३0-३२
जुलैचा पहिला आठवडा २४00-२५00 २७-२८
जुलैचा दुसरा आठवडा २३00 २५-२६
जुलैचा तिसरा आठवडा २२00-२३00 २४
जुलैचा शेवटचा आठवडा २0५0-२१00 २२-२४