साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही!

By Admin | Published: August 9, 2014 01:52 AM2014-08-09T01:52:41+5:302014-08-09T01:52:41+5:30

मागण्या मान्य होत नाहीत, तोर्पयत उसाचे कांडेही तोडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिला.

Sugar factory will not allow the chimneys to fire! | साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही!

साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही!

googlenewsNext
>कोल्हापूर : सी. रंगराजन समितीने सुचविलेल्या शिफारशीमधील कारखान्यांच्या हवाई अंतराची अट रद्द करा व साखरेच्या उत्पन्नातील 7क् टक्के वाटा ऊस दर म्हणून द्यावा, या मागण्या मान्य होत नाहीत, तोर्पयत उसाचे कांडेही तोडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिला.
सी. रंगराजन समितीच्या शिफारशी जशाच्या तशा लागू करा, अशी मागणी होती; पण सरकारने कारखानदारांच्या फायद्याच्या दोन शिफारशी लागू करून शेतक:यांना वा:यावर सोडले आहे. साखरेचे दर पडले तर त्याचा तोटा केवळ शेतक:यांच्या माथी, हे आता चालणार नाही. मागण्या होत नाहीत, तोर्पयत साखर कारखान्याचे एकही धुराडे पेटू देणार नाही, असे सांगतानाच पुढील आंदोलनाबाबत 11 व 12 ऑगस्टला पुणो येथे कार्यकत्र्याचा व्यापक मेळावा घेतला असून, त्यामध्ये या सर्व बाबींवर विस्तृत चर्चा केली जाणार असल्याचे पाटील म्हणाले.
केंद्राने पाच एकरांच्या आतील शेतक:यांचे कर्ज माफ केले; पण लहान शेतक:यांचेच कर्ज थकते असे नाही, निसर्गाचा फटका सर्वानाच सारखाच बसतो. त्यामुळे पाच एकरांवरील शेतक:यांना कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गूळ नियमन रद्द केले त्याचे स्वागत करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 
 
विधानसभेला तिसरा पर्याय देऊ!
च्कॉँग्रेस व भाजपाला वगळून शेतक:यांच्या प्रश्नांवर एकत्र येणा:या सर्व पक्षांना घेऊन सक्षम तिसरा पर्याय देणार आहे. यामध्ये बहुजन समाज पक्ष यांच्यासह अनेक पक्ष येण्यास इच्छुक असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Sugar factory will not allow the chimneys to fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.