७० हजार कोटी गोत्यात...! केंद्र सरकारच्या एका निर्णयानं गुंतवणूक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:04 AM2023-12-08T09:04:16+5:302023-12-08T09:04:28+5:30

इथेनॉल निर्मितीची वार्षिक क्षमता १,३६४ कोटी लिटरची आहे. नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या वर्षात देशात ५०० कोटी लिटरचे उत्पादन झाले आहे.

Sugar industry and distilleries have invested about 70 thousand crores in about 450 ethanol projects in the country | ७० हजार कोटी गोत्यात...! केंद्र सरकारच्या एका निर्णयानं गुंतवणूक अडचणीत

७० हजार कोटी गोत्यात...! केंद्र सरकारच्या एका निर्णयानं गुंतवणूक अडचणीत

चंद्रकांत कित्तुरे

कोल्हापूर : देशात सुमारे ४५० इथेनॉल प्रकल्पांत साखर उद्योग आणि डिस्टिलरीजनी सुमारे ७० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. केंद्र सरकारच्या एका निर्णयाने ही गुंतवणूकच गोत्यात आली आहे. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरेची दरवाढ होऊन ग्राहकांचा रोष ओढवणे केंद्र सरकारला परवडणारे नसल्याने हा निर्णय घेतल्याची म्हटले जात आहे. ज्या बँकांनी इथेनॉल प्रकल्पासाठी कर्ज दिले आहे. त्याची परतफेड कशी करायची? साखर उद्योगाबरोबरच कर्ज देणाऱ्या बँकाही अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

७९ टक्के इथेनॉल साखर उद्योगातून
इथेनॉल निर्मितीची वार्षिक क्षमता १,३६४ कोटी लिटरची आहे. नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या वर्षात देशात ५०० कोटी लिटरचे उत्पादन झाले आहे. यातील ७९ टक्के वाटा साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलचा आहे. यामुळे पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करता आले आहे. 

सोळा लाख टन साखरच इथेनॉलकडे जाणार
चालू हंगामात ३५ लाख टन साखर इथेनॉल निमिर्तीकडे वळविली जाईल, असा अंदाज होता. मात्र, आता  १५ ते १६ लाख टन साखर वापरली जाईल.

Web Title: Sugar industry and distilleries have invested about 70 thousand crores in about 450 ethanol projects in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.