‘कडब्यापासून साखर तयार करणार’
By Admin | Published: June 9, 2016 04:40 AM2016-06-09T04:40:36+5:302016-06-09T04:40:36+5:30
प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर मराठवाडा आणि विदर्भात उभारण्यात येतील असे प्रसिद्ध उद्योगपती आणि रसायनशास्रज्ञ डॉ.केकी होरमुसजी घरडा यांनी आज सांगितले.
मुंबई : कापूस आणि सोयाबीनच्या कडब्यापासून (चारा) साखर तयार करण्याचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर मराठवाडा आणि विदर्भात उभारण्यात येतील असे प्रसिद्ध उद्योगपती आणि रसायनशास्रज्ञ डॉ.केकी होरमुसजी घरडा यांनी आज सांगितले.
डॉ.घरडा यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे ते हा पुरस्कार घेण्यासाठी नवी दिल्लीत जाऊ शकले नव्हते. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला. त्यावेळी डॉ.घरडा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कापूस व सोयाबीनच्या कडब्यापासून साखर तयार करण्याचे संशोधन यशस्वी झाले आहे. ही साखर मधुमेहींसाठीही फायदेशीर आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांसाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही क्षत्रिय यांनी यावेळी दिली. (विशेष प्रतिनिधी)