देशातील साखर उत्पादन २१० लाख टन; महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 06:09 AM2020-03-14T06:09:00+5:302020-03-14T06:09:14+5:30

गुजरातमध्ये आठ लाख टन नवी साखर उत्पादित झाली असून, ते गतवर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा अडीच लाख टनाने कमी आहे.

Sugar production in the country is 5 lakh tonnes; Maharashtra ranked second | देशातील साखर उत्पादन २१० लाख टन; महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

देशातील साखर उत्पादन २१० लाख टन; महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

googlenewsNext

कोल्हापूर : देशात १३ मार्च २०२०पर्यंत नवे साखर उत्पादन २१० लाख टन झाले आहे. गतवर्षीच्या उत्पादनापेक्षा ते ५७ लाख टनाने कमी आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे प्रसिद्ध केलेलेल्या परिपत्रकाद्वारे जाहीर केले.

उत्तर प्रदेशने ८३ लाख टन साखरेचे उत्पादन करून आघाडी घेतली आहे. या उलट महाराष्ट्रातील ५५ लाख टन नवे साखर उत्पादन हे गतवर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा ४३ लाख टन कमी आहे. कर्नाटकमधील ३३ लाख टन नवे साखर उत्पादन हे देखील गतवर्षी या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा ९ लाख टनांनी कमी आहे. गुजरातमध्ये आठ लाख टन नवी साखर उत्पादित झाली असून, ते गतवर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा अडीच लाख टनाने कमी आहे.

हंगामअखेर देशपातळीवरील नवे साखर उत्पादन २६५ लाख टनाइतके सीमित राहण्याचे अनुमान असून, त्यात उत्तर प्रदेश ११८ लाख टन, महाराष्ट्र ६० लाख टन, कर्नाटक ३४ लाख टन आणि गुजरात नऊ लाख टन आहे. हंगामाच्या सुरुवातीची देशपातळीवरील शिल्लक जरी विक्रमी १४५ लाख टन इतकी असली तरी त्यातून राखीव साठा योजनेमधील ४० लाख टन व अपेक्षित निर्यात ५० लाख टनांची लक्षात घेता हंगामअखेर सुमारे ५५ ते ६० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय साखरेच्या दरात सध्या घसरण झालेली असली, तरी उद्दिष्टाप्रमाणे साखर निर्यात होण्यावरच नजीकच्या भविष्यातील स्थानिक साखर दर टिकून राहण्यास मदत होणार आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले.

Web Title: Sugar production in the country is 5 lakh tonnes; Maharashtra ranked second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.