साखर आयुक्तालयाचा खर्च शेतक-यांकडून, टनास ५० पैशांची कपात : हंगामात ३ कोटींना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:00 AM2017-10-14T04:00:32+5:302017-10-14T04:00:48+5:30

राज्यातील साखर उद्योगाचे नियोजन व नियंत्रण करणा-या साखर आयुक्त कार्यालयाचा देखभाल-दुरुस्तीचा खर्चही शेतक-यांच्याच खिशातून करण्यात येत आहे.

 Sugarcane expenditure cut by farmers, tanas by 50 paise: 3 crores for the season | साखर आयुक्तालयाचा खर्च शेतक-यांकडून, टनास ५० पैशांची कपात : हंगामात ३ कोटींना कात्री

साखर आयुक्तालयाचा खर्च शेतक-यांकडून, टनास ५० पैशांची कपात : हंगामात ३ कोटींना कात्री

Next

विश्वास पाटील 
कोल्हापूर : राज्यातील साखर उद्योगाचे नियोजन व नियंत्रण करणा-या साखर आयुक्त कार्यालयाचा देखभाल-दुरुस्तीचा खर्चही शेतक-यांच्याच खिशातून करण्यात येत आहे. त्यासाठी टनास ५० पैशांची कपात करण्याचा फतवा काढण्यात आला आहे. त्यानुसार, या हंगामात तीन कोटींहून जास्त रक्कम कपात करून घेतली जात आहे.
शेतक-यांच्याच पैशांतून पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या पाच एकर जागेत भव्य असे साखर संकुल उभारले आहे. या चार मजली इमारतीत तळमजल्यावर सहनिबंधक पुणे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कार्यालय व कॅन्टीन आहे. पहिल्या मजल्यावर प्रादेशिक साखर सहसंचालकांचे कार्यालय आहे. दुस-या मजल्यावर राज्य शासनाच्या कृषी विभागाचे कार्यालय
आहे. तिस-या व चौथ्या मजल्यावर साखर आयुक्तालय आहे. त्यासाठी १९९७ पासून कारखानदारांकडून पैसे गोळा करण्यास सुरुवात झाली व २००० साली हे संकुल उभारले. पाच वर्षांत राज्यभरातील शेतकºयांकडून टनास एक व दोन रुपयांप्रमाणे रक्कम गोळा करण्यात आली. त्या-त्या वर्षीचे गाळप व गोळा केलेली रक्कम याचा हिशोब केल्यास ही रक्कम ४० कोटी ७९ लाख रुपये होते.

Web Title:  Sugarcane expenditure cut by farmers, tanas by 50 paise: 3 crores for the season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.