नामदेवा कशाला घाई केली?; दोन-चार दिवस थांबला असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 08:05 AM2022-05-12T08:05:32+5:302022-05-12T08:06:15+5:30

जयभवानीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल, असेही पंडित म्हणाले. कोणीही उसाचे राजकारण करू नये, असा इशाराही राजकीय विरोधकांना दिला.

Sugarcane farmer commits suicide in Beed | नामदेवा कशाला घाई केली?; दोन-चार दिवस थांबला असता तर...

नामदेवा कशाला घाई केली?; दोन-चार दिवस थांबला असता तर...

googlenewsNext

गेवराई : गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव नामक शेतकऱ्याने त्याच्या शेतातील ऊस गाळपाला जात नसल्याने फड पेटवून आत्महत्या केली. हिंगणगाव येथील बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होता, यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव यांचा होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही उसाचे गाळप जयभवानी कारखाना करणार होते, असे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नामदेवा घाई कशाला केलीस, दोन-चार दिवस थांबला असता तर सगळं काही बरं झालं असतं, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जयभवानी सहकारी साखर कारखान्याने आजवर ५ लाख ७२ हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे. कार्यक्षेत्रातील नोंदीच्या उसाबरोबरच बिगर नोंदीचा ऊसही गाळपाचे नियोजन कारखान्याने केले आहे. शेतकऱ्यांनी संयम राखणे गरजेचे असून, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही पंडित यांनी केले. जयभवानीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल, असेही पंडित म्हणाले. कोणीही उसाचे राजकारण करू नये, असा इशाराही राजकीय विरोधकांना दिला.

नामदेवच्या उसाबद्दल काय म्हणाले चेअरमन

जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे १०१ हेक्टर ८० आर. क्षेत्रावरील उसाची नोंद जयभवानीकडे होती. नोंद असलेल्या सर्व उसाचे गाळप जयभवानीकडून करण्यात आले, तर बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकऱ्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला होता. यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव यांचा होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही उसाचे गाळप होणार होते. मागील वर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याने त्यांच्या उसाचे गाळप केले होते. मात्र, यावर्षी गंगामाई शुगर्सने त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला नाही, असे ते म्हणाले.

१८ कारखान्यांनी गेवराईला वाऱ्यावर सोडले

१८ साखर कारखान्यांकडून दरवर्षी जयभवानीच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप केले जात होते. मात्र, अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या कारखान्यांनी गेवराई तालुक्यातील ऊस उत्पादकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे अमरसिंह पंडित म्हणाले.

Web Title: Sugarcane farmer commits suicide in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.