ऊस उत्पादकांना मिळणार ११०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 02:27 AM2020-12-17T02:27:41+5:302020-12-17T02:27:55+5:30

साखर निर्यात योजना; अनुदान कमी झाल्याने कारखानदार नाराज

Sugarcane growers will get Rs 1,100 crore | ऊस उत्पादकांना मिळणार ११०० कोटी

ऊस उत्पादकांना मिळणार ११०० कोटी

Next

- राजाराम लोंढे

कोल्हापूर :  केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या निर्यात अनुदान योजनेतील  ६० लाख टनांपैकी सुमारे १८ लाख टन साखरेचा निर्यात कोटा महाराष्ट्राच्या वाट्याला येईल.   या  निर्यातीची लक्ष्यपूर्ती झाल्यास राज्यातील ऊस उत्पादकांना सुमारे ११०० कोटी रुपये मिळू शकतील. 
केंद्र सरकारने गतवर्षीपेक्षा निर्यात अनुदानाला कात्री लावली असून, प्रतिकिलो सहा रुपये अनुदान मिळणार आहे. गेली दोन वर्षे साखर उद्योग विविध अडचणींतून जात आहे. उसाची वाढलेली एफआरपी आणि बाजारातील साखरेच्या दरामुळे कारखान्यांचे अर्थकारण बिघडले आहे. केंद्र सरकारने मागील गळीत हंगामात साखर निर्यातीचे धोरण घेतले होते. त्यासाठी कारखान्यांना टनाला एक हजार ४४८ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी प्रतिकिलो १० रुपये ४५ पैसे अनुदान होते; मात्र यंदा सहा रुपये दिले जाणार आहे. कमी का असेना, अनुदान देऊन सरकारने साखर उद्योगाला दिलासा दिला. मात्र साखरेच्या किमान दराबाबत निर्णय अपेक्षित होता, असे साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे यांनी सांगितले.

Web Title: Sugarcane growers will get Rs 1,100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.