ऊस दर आंदोलन चिघळणार, स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 04:01 PM2018-11-07T16:01:17+5:302018-11-07T16:03:48+5:30

साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.

Sugarcane movement will be ignited; | ऊस दर आंदोलन चिघळणार, स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा

ऊस दर आंदोलन चिघळणार, स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा

Next
ठळक मुद्देसाखर पट्ट्यातील ऊस दर आंदोलन चिघळणार११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा

सांगली : साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.


यंदाच्या ऊस हंगामात अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना साखर कारखानदारांनी परस्पर हंगाम सुरू करण्याची तयारी सुरु केली आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु देणार नसल्याचा इशारा दिला आहे. जर कारखाने सुरु झाले तर, एकरकमी ३२१७ रुपये मान्य असे समजू, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे स्वरुप सांगलीत जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात सर्वत्र  चक्का जाम करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या काळात महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून गावागावात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. हे आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला आहे.

संघटनेतर्फे तशा आशयाची लेखी पत्रे प्रत्येक कारखान्याच्या प्रशासनाला देण्यात येणार आहेत. तोडगा न काढता दडपशाहीच्या मागार्ने हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असेही संघटनेने म्हटले आहे.

दिवाळी संपताच शुक्रवार किंवा शनिवारपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतल्याने संघटनाही आक्रमक बनली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कोडोली येथील ऊस परिषदेत एफआरपी व जादा २०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली.

उसाला चांगला भाव देण्यासाठी प्रसंगी सरकार तिजोरी रिकामी करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यानुसार एफआरपी व जादा २०० रुपये मिळाल्याशिवाय ऊस पुरवठा करायचा नाही, असा निर्णय शेतक?्यांनीच जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत घेतला आहे.

कोणत्याही कारखान्याने शेतक?्यांनी मागणी केलेले अंतिम बिल व यंदाच्या पहिल्या उचलीसंदर्भात कारखान्याची भूमिका काय आहे? याबद्दल स्पष्ट केलेले नाही. पोलिसांच्या बळाचा वापर करून कारखाना सुरू करणार असल्याचे आम्हाला समजले आहे. ऊसदराचे कोणतेही धोरण जाहीर न करता हंगाम सुरू केल्यास संघटना ते चालू देणार नाही, असेही म्हटले आहे.

Web Title: Sugarcane movement will be ignited;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.