साखरेपाठोपाठ ऊस दरही घसरला; २१00 रुपये दर देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 01:16 AM2018-01-26T01:16:19+5:302018-01-26T01:16:33+5:30

यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या भावात सतत होणाºया घसरगुंडीमुळे उसाचे भावही गडगडले आहेत. शेतकरी संघटना प्रति टन उसाला पहिली उचल २५00 रुपये मागत असताना तेवढी एफआरपी देणेही शक्य नसल्याचे कारखानदार म्हणत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत एकवीसशे भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

 Sugarcane sugar slips after sugar fall; The decision to pay a rate of Rs 2100 | साखरेपाठोपाठ ऊस दरही घसरला; २१00 रुपये दर देण्याचा निर्णय

साखरेपाठोपाठ ऊस दरही घसरला; २१00 रुपये दर देण्याचा निर्णय

googlenewsNext

मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या भावात सतत होणाºया घसरगुंडीमुळे उसाचे भावही गडगडले आहेत. शेतकरी संघटना प्रति टन उसाला पहिली उचल २५00 रुपये मागत असताना तेवढी एफआरपी देणेही शक्य नसल्याचे कारखानदार म्हणत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत एकवीसशे भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
या हंगामात शेतकरी संघटनांनी ३५00 रुपये पहिली उचल देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. नंतर २५00 रुपयांपर्यंत माघार घेतली. गंगामाई कारखान्याने २५२५, ज्ञानेश्वरने २५०० तर केदारेश्वरने २५५० रुपये पहिली उचल जाहीर केली. अशोकने २१००, कुकडी, प्रसाद, गणेश, विखे, थोरात, काळे व संजीवनी कारखान्याने २३०० रुपये पहिली उचल जाहीर केली. हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा प्रति क्विंटल ४ हजार रुपये भाव ३४०० ते ३२००वर आल्याने २३०० रुपयेच पहिली उचल शक्य आहे. साखरेचा दर ३००० रुपयांपेक्षा कमी झाल्यास उसाला भाव देणे अवघड होईल, असे थोरात कारखान्याचे माधवराव कानवडे यांनी स्पष्ट केले होते.
देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा भाव २८५० रुपयांवर आला आहे. तो आणखी घसरू शकतो. याबाबत साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदारांची बैठक झाली. त्यात साखरेच्या दरातील घसरणीमुळे एफआरपी देणेही शक्य नसल्याने कारखान्यांनी २१०० रुपये भाव द्यावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २५५० च्या आसपास पहिली उचल जाहीर करणाºया कारखान्यांनाही माघार घ्यावी लागली आहे.
पैसा देणार कसा?
साखरेच्या दरात सतत घसरण होत आहे. हंगामाच्या सुरुवातीस नोव्हेंबरमध्ये असलेला साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटल साखरेचा भाव आता २८५० रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यानुसार राज्य सहकारी बँकेचे साखरेचे मूल्यांकन १७५० रुपयांपर्यंत खाली आले आहे. साखरेच्या दरासोबतच मूल्यांकन आणखी कमी होणार आहे. त्यामुळे उसाला पैसा देणार कसा? एफआरपी देणेही अशक्य आहे. त्यामुळे २१०० रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
- शिवाजीराव नागवडे, अध्यक्ष, राज्य साखर संघ

Web Title:  Sugarcane sugar slips after sugar fall; The decision to pay a rate of Rs 2100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.