साखर सांडली की मुंग्या येणारच

By admin | Published: January 4, 2017 01:42 AM2017-01-04T01:42:54+5:302017-01-04T01:42:54+5:30

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत

Sugarcane will come from the ants | साखर सांडली की मुंग्या येणारच

साखर सांडली की मुंग्या येणारच

Next

मुंबई : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत काही बोलल्यास आम्हाला लगेच जुन्या विचारांचे ठरवले जाते. पण पेट्रोलजवळ आग नेली तर आग भडकणारच, साखर सांडली तर मुंग्या जमा होणारच. स्त्री आणि पुरुषांमध्ये एक योग्य अंतर असावे, आजकाल महिला जितक्या तोकड्या कपड्यात वावरतील तितके त्यांना फॅशनेबल आणि आधुनिक समजले जाते. अशा तोकड्या पेहरावांमुळे विनयभंगासारखे प्रकार घडतात, असे विधान आझमी यांनी केले.
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ३१ डिसेंबरच्या पार्टीदरम्यान पोलिसांदेखत अनेक महिलांची छेडछाड काढण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सदर घटनेसाठी पार्टीसाठी आलेल्या तरुण-तरुणींनाच जबाबदार धरले. पोलिसांची संख्या मर्यादित आहे. पार्टीसाठी आलेल्यांचे पाश्चात्त्य कपडे आणि वागणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी वाद ओढवून घेतला होता.
परमेश्वरन यांच्या विधानाचीच अबू आझमी यांनी री ओढली आहे. बंगळुरू येथील घटनेसाठी महिलांनाच जबाबदार धरत भारतीय संस्कृतीपासून दूर गेल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात, असे विधान आझमी यांनी केले. बंगळुरू येथील घटना दुर्दैवी असून, संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मात्र हल्लीच्या जमान्यात महिला जितके तोकडे कपडे घालेल, जितके अंगप्रदर्शन करेल, तितकेच तिला आधुनिक, फॅशनेबल आणि सुशिक्षित मानले जाते. हे फॅड वाढले आहे. माझी बहीण किंवा मुलगी सूर्यास्तानंतर परपुरुषासोबत थर्टी फर्स्ट साजरा करीत असेल आणि तिच्यासोबत तिचा नवरा किंवा भाऊ नसेल तर हे योग्य नाही,’ असेही आझमी म्हणाले. दरम्यान, अबू आझमी यांच्या या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना समन्स बजावले आहे. आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी ही माहिती दिली. (प्रतिनिधी)

आझमींचे वक्तव्य चिथावणीखोर - गोऱ्हे
नववर्षाचे स्वागत करणाऱ्या महिलांशी काही समाजकंटक श्वापदाप्रमाणे वागतात. आयटी क्षेत्रातील महानगरांमध्ये अशा घटना घडणे देशाच्या विकासासाठी मारक आहे. त्यातच अबू आझमींसारखी मंडळी महिलांच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करून महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणतात. महिलांवर बंधने आणि पुरुषांना मोकळे रान देणारी चिथावणीखोर वक्तव्ये थांबायला हवीत, असे मत शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

Web Title: Sugarcane will come from the ants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.