शुगरफ्री ‘स्टेव्हिया’ लागवडीचा प्रयोग यशस्वी, उसापेक्षा ३00 पट गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:07 AM2017-11-06T05:07:25+5:302017-11-06T05:07:30+5:30

उसापेक्षा ३०० पट गोड ‘स्टेव्हिया’ या वनस्पतीची भारतात वाढ करण्याचा अभ्यास प्रकल्प अकोटच्या श्रीनाथ देवानंद मर्दाने या संशोधकाने यशस्वी केला आहे.

Sugarfree 'stevia' cultivation was successful, 300 times sweet to the crop | शुगरफ्री ‘स्टेव्हिया’ लागवडीचा प्रयोग यशस्वी, उसापेक्षा ३00 पट गोड

शुगरफ्री ‘स्टेव्हिया’ लागवडीचा प्रयोग यशस्वी, उसापेक्षा ३00 पट गोड

Next

अकोट : उसापेक्षा ३०० पट गोड ‘स्टेव्हिया’ या वनस्पतीची भारतात वाढ करण्याचा अभ्यास प्रकल्प अकोटच्या श्रीनाथ देवानंद मर्दाने या संशोधकाने यशस्वी केला आहे. ही वनस्पती उसापेक्षा ३०० पट गोड असूनही ‘शुगरफ्री’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारतात स्टेव्हियावरील संशोधन व शेती करण्यास केंद्र शासनाने प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा श्रीनाथ मर्दाने यांनी व्यक्त केली आहे.
अकोटला वाल्मीक नगरात राहणाºया श्रीनाथ देवानंद मर्दानेने नाशिकच्या के.के. वाघ कॉलेज आॅफ अ‍ॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमधून बी. एस. सी. (अ‍ॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी) शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. त्यांनी अंतिम वर्षाचा अभ्यास करीत असताना केवळ दक्षिण अमेरिकेतच उगवणाºया ‘स्टेव्हिया’ या वनस्पतीची भारतीय वातावरणात वाढ करण्याचा आव्हानात्मक अभ्यास प्रकल्प स्वीकारला होता. प्रयोगशाळेत तीन महिने निरीक्षणे नोंदवून श्रीनाथ यांनी ही वनस्पती बाटलीत मायक्रो प्रोपोगेशन लॅब कंडिशनमध्ये ८०-९० टक्के वाढवली. विविध शाखांवर संप्रेरकाच्या (हार्मोन्स) प्रक्रिया करून या वनस्पतीची पूर्ण वाढ करण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sugarfree 'stevia' cultivation was successful, 300 times sweet to the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.