प्लास्टिकला पर्याय सुचवा, कोणीही बेरोजगार नाही होणार; एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 06:29 AM2022-08-01T06:29:46+5:302022-08-01T06:30:02+5:30

महाराष्ट्र व्यापारी परिषदेत ग्वाही 

Suggest an alternative to plastic, no one will be unemployed; Proposed by Eknath Shinde | प्लास्टिकला पर्याय सुचवा, कोणीही बेरोजगार नाही होणार; एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव

प्लास्टिकला पर्याय सुचवा, कोणीही बेरोजगार नाही होणार; एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्लास्टिकचे दुष्परिणामही आहेत. त्याच्या वापराने कॅन्सर  होत आहेत. शेवटी सरकार सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच निर्णय घेत असते. मात्र,  प्लास्टिकला पर्याय काय, ते व्यापारी, उद्योजकांनी  सुचवावे. अन्नधान्यावरील जीएसटी व अन्य प्रश्नांवर लवकरच व्यापाऱ्यांची मुंबईत बैठक घेऊ. त्यावर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, आम्हाला कोणाला बेरोजगार करायचे नाही, कोणाचे व्यवसाय बंद पाडायचे नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिला. 

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर, मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री् व जिल्हा व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘महाराष्ट्र व्यापारी परिषद’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न सकारात्मक विचारातून सोडविण्याचे आश्वासन दिले. व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे 
राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, आ. संदीपान भुमरे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, तनसुख झांबड, आदेशपालसिंग छाबडा, सत्यनारायण लाहोटी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल, उद्योजक घनश्याम गोयल होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील व्यापार, उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे व त्याला चालना देण्याचे कार्य हे सरकार करेल. महाराष्ट्र 
चेंबरने कृषीपूरक उद्योगांच्या विकासासाठी, तसेच राज्यात गुंतवणूक वाढीसाठीही प्रयत्न करावे. महाराष्ट्र चेंबरने दिलेल्या कौशल्य विकासाच्या प्रस्तावाला चालना देण्यात 
येईल.  

राजकीय बंदमध्ये व्यापारी नसतील  
nमहाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्पष्ट केले की, यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने बंदचे आवाहन केले, तर त्यात व्यापारी सहभागी होणार नाहीत. व्यापाऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली, तर बंद न पाळता वेगळ्या मार्गाने प्रश्न सोडविणार. 
nअन्नधान्यावरील जीएसटी निर्णय मागे न घेतल्यास मुंबईत ५० हजार व्यापारी आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. 

Web Title: Suggest an alternative to plastic, no one will be unemployed; Proposed by Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.