सुहेल शर्मा यांनी केले एव्हरेस्ट सर!

By Admin | Published: May 21, 2016 03:16 AM2016-05-21T03:16:57+5:302016-05-21T03:16:57+5:30

मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी ठरले एवरेस्ट सर करणारे पहिलेच आयपीएस अधिकारी.

Suhail Sharma made Everest Sir! | सुहेल शर्मा यांनी केले एव्हरेस्ट सर!

सुहेल शर्मा यांनी केले एव्हरेस्ट सर!

googlenewsNext

राजेश शेगोकार/बुलडाणा
मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून 'एव्हरेस्टवीर' होण्याचा मान मिळविला. ही कामगिरी करणारे शर्मा हे पहिलेच आयपीएस अधिकारी ठरले आहेत.
भारतीय पोलीस प्रशासकीय सेवेच्या २0१२च्या तुकडीचे अधिकारी असलेले सुहेल शर्मा हे १४ सप्टेंबर २0१४ रोजी मेहकर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त झाले. विविध टप्पे पार केल्यानंतर २0 मे रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास या चमूने हे शिखर सर केले.
सुहेल विरेंद्र शर्मा हे मुळचे अमृतसर येथील रहिवाशी असून १0 दिवसांपूर्वीच त्यांची कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गतवर्षी ते बेस कॅम्पपर्यंत पोहचले होते. परंतु २४ एप्रिल २0१५ रोजी काठमांडू येथे झालेल्या भूकंपामुळे बेस कॅम्पवर हिमकडा कोसळली. या घटनेत शर्मा यांच्या सहकार्‍यांचा मृत्यू झाला तर ते जखमी झाले होते. या घटनेमुळे त्यांना माघारी फिरावे लागले होते. मात्र न डगमगता त्यांनी पुन्हा एव्हरेस्टवारी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आई उमा शर्मा, भाऊ समीर यांनी त्यांचे मनोबल वाढविले.
सुहेल शर्मा यांनी मिळविलेले यश हे पोलीस दलासाठी अभिमानास्पद आहे. ह्यएव्हरेस्टवीरह्ण सुहेल परतल्यावर त्यांचा महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येईल. हा दिवस आमच्या पोलीस दलासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी म्हटले तर बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी सुहेल शर्मा यांच्या धाडसी कामगिरीमुळे संपूर्ण पोलीस दलाची मान उंचावली असल्याचे म्हटले आहे.
या मोहिमेत सहभागी सदस्य
१) शेखरबाबू बिचनपल्लई (मोहीम प्रमुख)
२) प्रभाकरन एस. (आयएफएस)
३) सुहेल शर्मा (आयपीएस)
४) राधिका जी.आर.
५) भदराही डी.
६) बालन शिवरामन
७) अशोक मुद्मो
८) डॉ. विमल जयस्वाल

Web Title: Suhail Sharma made Everest Sir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.