सुहास कांदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; 2 माजी गृहराज्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 05:35 PM2022-07-22T17:35:49+5:302022-07-22T17:37:10+5:30
शिवसेना शिंदे गटात सामील झालेले आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्यास नकार दिला होता, असा आरोप कांदे यांन केला आहे.
मुंबई: शिवसेना आमदार सुहास कांदे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आत. शिंदे गटात गेल्यावर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्यास नकार दिला होता, असा आरोप कांदे यांन केला आहे.
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार होते, तेव्हा एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी तशी माहिती दिली होती. त्यावेळी गृहविभागाने शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता. पण, उद्धव ठाकरे यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्र्यांना फोन करुन सुरक्षा देण्यास मनाई केली, असा दावा कांदे यांनी केला आहे.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
सुहास कांदे यांच्या दाव्यावर राज्यातील दोन तत्कालिन गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे. 'सुहास कांदे यांनी केलला आरोप योग्य आहे, उद्धव ठाकरेंचा अशा पद्धतीचा फोन आला होता. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांचे धमकीचे पत्र आले होते. त्यांना सुरक्षा देण्याची गरज होती, पण उद्धव ठाकरेंनी विरोध,' असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.
सतेज पाटलांकडून आरोपांचे खंडन
यासंदर्भात, काँग्रसे नेते सतेज पाटील म्हणाले की, 'नेत्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री हस्तक्षेप करत नाहीत. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. अहवाल पाहिला जातो आणि निर्णय घेतला जातो. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही सूचना आली असेल यात तथ्य वाटत नाही, असं पाटील म्हणाले.