सुहास खामकर, गणोश खोगाडे यांना जामीन मंजूर

By Admin | Published: August 8, 2014 01:21 AM2014-08-08T01:21:36+5:302014-08-08T01:21:36+5:30

पन्नास हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शरीरसौष्ठवपटू आणि पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर, गणोश खोगाडे यांची न्यायालयाने गुरुवारी जामिनावर सुटका केली.

Suhas Khamkar, Ganosh Khogade granted bail | सुहास खामकर, गणोश खोगाडे यांना जामीन मंजूर

सुहास खामकर, गणोश खोगाडे यांना जामीन मंजूर

googlenewsNext
>अलिबाग : पन्नास हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शरीरसौष्ठवपटू आणि पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर, गणोश खोगाडे यांची न्यायालयाने गुरुवारी जामिनावर सुटका केली. 25 हजार रुपयांचा व्यक्तिगत जातमुचलका, दर बुधवारी 11 ते 2 या वेळेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग येथील कार्यालयात तपासकामासाठी हजेरी लावण्याच्या अटीवर या दोघांना जामीन देण्यात आला.
खामकर व खोगाडे यांची पोलीस कोठडी गुरुवारी संपली. त्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश एच.ए. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपास कामासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने खामकर व खोगाडे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यावर खामकर व खोगाडे यांच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने दोघांचेही जामीन अर्ज मंजूर केले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Suhas Khamkar, Ganosh Khogade granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.