सुहासिनी देशपांडे यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव
By Admin | Published: October 29, 2015 12:08 AM2015-10-29T00:08:11+5:302015-10-29T00:08:11+5:30
रंगभूमीदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या जयवंतराव टिळक स्मृती जीवनगौरव
पुणे : रंगभूमीदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या जयवंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी सुहासिनी देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा ५ नोव्हेंबरला होणार आहे.
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. शाखाध्यक्ष सुरेश देशमुख आणि प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांनी पुरस्कारांविषयी माहिती
दिली.
कविता विवेक जोशी, शमा अशोक वैद्य यांना माता जानकी पुरस्कार, रजनी भट यांना प्रपंच लक्ष्मी पुरस्कार, वंदना व रवींद्र घांगुर्डे यांना लक्ष्मी-नारायण पुरस्कार, तर भारती बाळ गोसावी यांना चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण दि. ५
रोजी सायंकाळी ५.३० वाजता
टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे.
ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त अध्यक्षस्थानी असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या वेळी नाट्यसंगीत व नृत्याचा समावेश असलेला ‘जल्लोष’ हा कार्यक्रम होणार आहे.
(प्रतिनिधी)