मराठवाड्यात 2 आठवड्यात 50 शेतक-यांच्या आत्महत्या
By Admin | Published: March 22, 2016 10:27 AM2016-03-22T10:27:16+5:302016-03-22T10:36:23+5:30
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात 50 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 28 जिल्ह्यांतील शेतक-यांनी दुष्काळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे
>ऑनलाइन लोकमत -
औरंगाबाद, दि. २२ - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात 50 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 28 जिल्ह्यांतील शेतक-यांनी दुष्काळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात 50 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासूनची आकडेवारी पाहता बीडमध्ये सर्वात जास्त 41 शेतक-यांपासून आत्महत्या केली आहे.
मराठवाड्यातील 50 शेतक-यांनी आत्महत्या केल्याने यावर्षीचा शेतकरी आत्महत्येचा आकडा 244 पर्यंत गेला आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी एकूण 1130 शेतक-यांनी आत्महत्या केली होती.
जिल्हाधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या मार्च महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पाहता यावर्षी शेतकरी आत्महत्येत 40 ते 50 टक्के घट झाली आहे. सरकारने आणलेल्या योजनांमुळे आत्महत्या कमी झाल्याचा दावा अधिकारी करत आहेत. 'बीडमध्ये मार्च महिन्यात गतवर्षी 70 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. तुलनेत यावर्षी कमी आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या 40 ते 50 टक्यांनी कमी झाल्या आहेत', अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी दिली आहे.