आत्महत्या ; २ अटकेत

By Admin | Published: August 4, 2016 02:35 AM2016-08-04T02:35:26+5:302016-08-04T02:35:26+5:30

सुरेश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अभिजित तळवलकर (४५) आणि पांडुरंग यादव (७६) या दोघांना अटक केली

Suicide; Attempt 2 | आत्महत्या ; २ अटकेत

आत्महत्या ; २ अटकेत

googlenewsNext


पालघर: येथील सायकल मार्टचे मालक कमलाकर ऊर्फ सुरेश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अभिजित तळवलकर (४५) आणि पांडुरंग यादव (७६) या दोघांना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. आरोपीना ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पालघर न्यायालयाने दिले आहेत.
पालघरमधील प्रसिद्ध सायकल मार्टचे मालक सुरेश पाटील यांनी आपल्या दुकानाच्या विक्र ीतून मिळालेल्या दोन गाळ्यांच्या पैशांच्या व्यवहारातून कमलाकर पाटील यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अभिजित तळवलकर, पांडुरंग यादव, भोला तिवारी, सुरेंद्र तिवारी हे जबाबदार असल्याचे लिहून ठेवले होते. या प्रकरणी पालघर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी अजय जगताप यांनी संबंधितांवर गुन्हा नोंदवणे अपेक्षित असतांना आरोपींना सूट देत गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे राहुल कमलाकर पाटील याने पालघर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतरही पालघर पोलीस स्टेशन परिसरात या प्रकरणात गुन्हा घडला. मात्र त्यात वरील चार हे आरोपी आहेत, असे कुठे तपासात निष्पन्न होत नसल्याचा अहवाल सादर केला होता. (प्रतिनिधी)
>गंभीर बाब पोलिसांची संशयास्पद भूमिका
हे प्रकरण तपासासाठी पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांच्याकडे आल्यानंतर खरी तपासाची चक्रे फिरू लागली. सुसाइड नोटमध्ये नावे असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल न करणे, दोन आरोपींची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी, पैशांच्या देवघेवी संदर्भातील मोबाइल संदेश इ. गंभीर बाबी समोर आल्यानंतर काल गुन्हे शाखेने तळवलकर आणि यादव यांना अटक केली. तर अन्य दोन आरोपी फरार आहेत.पालघर पोलीस स्टेशनच्या संशयास्पद भूमिकेमुळे राहुल पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात या अहवालाला आव्हान दिले होते. खंडपीठाने या प्रकरणातील गांभीर्य समजून घेत सहा.पो. निरीक्षक जगताप यांच्याकडून तपास काढून घेत तो जिल्ह्याच्या एस.पी. शारदा राऊत यांच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Suicide; Attempt 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.