वीज वितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: September 5, 2015 01:26 AM2015-09-05T01:26:35+5:302015-09-05T01:26:35+5:30

नादुरुस्त वीज रोहित्रामुळे शेतातील पिके पाण्याअभावी सुकत असताना वारंवार मागणी करूनही नवे रोहित्र बसविले जात नसल्याने तालुक्यातील एका शेतकऱ्याने वीज

Suicide attempt at the power distribution office | वीज वितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

वीज वितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

Next

कारंजा लाड (वाशिम) : नादुरुस्त वीज रोहित्रामुळे शेतातील पिके पाण्याअभावी सुकत असताना वारंवार मागणी करूनही नवे रोहित्र बसविले जात नसल्याने तालुक्यातील एका शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच विषप्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली.
कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापूरे) येथील शेतकऱ्यांनी उच्च क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्यासाठी कंपनीकडे २०१३मध्ये अर्ज केला होता. अतिरिक्त दाब येऊन या रोहित्रात वारंवार बिघाड येत होता. त्यामुळे वीजपुरवठ्याअभावी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते. हे रोहित्र बदलून नवे आणि अधिक क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती; परंतु शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत नव्हती.
खेर्डा (जिरापुरे) येथील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी येथील वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांची कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच संजय गागरे नामक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. इतर शेतकऱ्यांनी लगेच त्यांच्या हातातील विषारी औषधाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide attempt at the power distribution office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.