कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: October 17, 2015 02:01 AM2015-10-17T02:01:25+5:302015-10-17T02:10:34+5:30
अल्पभूधारक शेतक-याने प्राशले वीष.
Next
रिधोरा (अकोला): नापिकी आणि कर्जबाजारीपणास हिंगणा (निंबा) येथील अल्पभूधारक शेतकर्याने शुक्रवारी वीष प्राशन करून आत्महत्या केली. शेतकरी किसन रावजी तायडे (६0) हे मृताचे नाव आहे. त्यांनी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी वीष प्राशन केले. त्यांना अकोल्याच्या सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तायडे यांच्याकडे अवघी दोन एकर शेतजमीन आहे. यावर्षी दुबार पेरणी करूनही नापिकी झाल्याने, तसेच बँक आणि खासगी सावकाराच्या थकीत कर्जास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.