कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By admin | Published: July 25, 2016 01:25 AM2016-07-25T01:25:17+5:302016-07-25T01:25:17+5:30

नापिकी व कर्जाला कंटाळून स्वत:च्या शेतात विष घेऊन आत्महत्या.

Suicide of Debt Farmer | कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

Next

मानोरा (जि. वाशिम) : तालुक्यातील हट्टी येथील चेनसिंग दलसिंग राठोड या ५0 वर्षीय शेतकर्‍याने नापिकी व कर्जाला कंटाळून स्वत:च्या शेतात विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान घडली.
चेनसिंग राठोड यांनी गतवर्षी मुलीचे लग्न करण्याकरिता तीन एकर शेती विकली होती. उर्वरित दोन एकर शेतामध्ये कुटुंबाचे पालन पोषण करून पत्नी व मुलासह जीवन जगत होते. सततची नापिकी व दुष्काळ, तसेच खासगी कर्ज व उसनवारीचे देणे यामुळे ते काही दिवसांपासून चिंतेत होते. कर्ज कसे फेडावे, या चिंतेतूनच त्यांनी २४ जुलै रोजी शेतात कीटकनाशक घेतले. ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Suicide of Debt Farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.