कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: November 24, 2015 01:35 AM2015-11-24T01:35:13+5:302015-11-24T01:58:33+5:30
कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत, मानोरा तालुक्यातील शेतक-याची आत्महत्या.
Next
मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथील एका शेतकर्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. शेंदुरजना अढाव येथील शेतकरी शेषराव आडे यांच्याकडे कोरडवाहू शेती होती. या शेतीसाठी त्यांनी खासगी सावकारांकडून, तसेच स्टेट बँकेकडून कर्ज घेतले होते. तीन वर्षांंपासून शेतीमधून उत्पन्नच होत नसल्याने त्यांचे कर्ज वाढतच होते. हे कर्ज फेडायचे कसे ही चिंता त्यांना सतावत होती. या चिंतेतूनच त्यांनी स्वत:च्या शेतात वीष प्राशन करून आत्महत्या केली.