उच्चशिक्षित दाम्पत्याची मुलीसह आत्महत्या

By Admin | Published: April 24, 2017 04:04 AM2017-04-24T04:04:09+5:302017-04-24T04:05:04+5:30

इंजिनीअर पती आणि डॉक्टर पत्नीने आपल्या पंधरा वर्षीय मुलीसह आत्महत्या केली. पनवेलजवळच्या कामोठे वसाहतीत रविवारी सकाळी ही घटना घडली.

Suicide with a highly educated couple's daughter | उच्चशिक्षित दाम्पत्याची मुलीसह आत्महत्या

उच्चशिक्षित दाम्पत्याची मुलीसह आत्महत्या

googlenewsNext

कळंबोली (नवी मुंबई) : इंजिनीअर पती आणि डॉक्टर पत्नीने आपल्या पंधरा वर्षीय मुलीसह आत्महत्या केली. पनवेलजवळच्या कामोठे वसाहतीत रविवारी सकाळी ही घटना घडली. आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे ‘सुसाइड नोट’मध्ये लिहिलेले आहे.
येथील सेक्टर ३६मध्ये इंद्रविहार इमारतीमध्ये इंद्रजीत दत्ता (५०), त्यांची पत्नी जास्मीन पटेल (४५) आणि मुलगी ओशीन राहत होते. जास्मीन गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी जीवनयात्रा संपविण्याच्या निर्णय घेतला. पण आपल्या पश्चात मुलीचे काय होणार, या चिंतेतून त्यांनी ओशीन हिलाही आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आणि दोघींनी गळफास घेतला.
त्या वेळी बाहेर गेलेले पती इंद्रजीत दत्ता चावीने घर उघडून आत गेले असता त्यांना मायलेकी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यातून त्यांनीही गळफास घेतला. दोघांनीही दोन सुसाइड नोट लिहून ठेवल्या असून यात ही माहिती नमूद आहे.
डॉ. जास्मिन यांनी मोलकरणीला दोन दिवस कामावर येऊ नको, असे सांगितले होते. त्यामुळे तिने सुट्टी घेतली होती, परंतु रविवारी सकाळी ती घरकामासाठी आली असता दरवाजाला चावी तशीच होती. तिने दार उघडले तेव्हा हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)

कर्जबाजारी झाल्याचीही चर्चा-
कर्जबाजारीपणामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याची चर्चा 
परिसरात सुरू होती. तसेच इंद्रजीत आणि जास्मिन हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही बोलले जात आहे. परंतु याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
देह अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना द्यावेत : आमच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता केईएम येथे विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता दान करावेत, अशी इच्छा सुसाइड नोटमध्ये व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार तिघांचेही मृतदेह केईएम रुग्णालयात पाठवल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त बी. एस. बुधवंत यांनी दिली.

Web Title: Suicide with a highly educated couple's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.