विद्यार्थिनींची महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

By admin | Published: June 25, 2017 06:03 PM2017-06-25T18:03:08+5:302017-06-25T18:03:08+5:30

पूर्वा सोमनाथ वाघमारे (वय १७,रा.शितळानगर, मामुर्डी) हिने चौथ्या मजल्यावरून उडी मारली.

Suicide by jumping from students' college building | विद्यार्थिनींची महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

विद्यार्थिनींची महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 25 - महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास दिला, त्यामुळे पूर्वा सोमनाथ वाघमारे (वय १७,रा.शितळानगर, मामुर्डी) हिने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यात गंभीर जखमी झालेल्या पुर्वाला रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी रविवारी तिचा मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा संबंधित कर्मचाऱ्यावर दाखल केला आहे. भूषण महाजन (वय ३५,रा.मोहननगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

चिंचवड मोहांनगर येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात पूर्वा वाघमारे बारावी शास्त्र शाखेत शिकत होती. कनिष्ठ महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीची पर्स हरवली होती. ती पुर्वाला सापडली. पुर्वाने हातात घेऊन ती पुन्हा तेथेच टाकून दिली. परंतू त्या पर्समध्ये असलेली रक्कम चोरीस गेल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाचे म्हणणे होते. व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी पुर्वाच्या पालकांना महाविद्यालयात बोलावून घेतले. एका विद्यार्थिनीची पर्स पूर्वाला सापडली होती, त्या पर्समधील गहाळ झालेली रक्कम जमा करावी, असा आग्रह पुर्वाच्या पालकांकडे धरण्यात आला. पुर्वाने पर्स मला सापडली, परंतू हातात घेऊन पुन्हा तेथेच ठेवली असे सांगितले. तसेच ही बाब महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. असे नमूद केले.

पर्समधील रक्कम मी काढून घेतल्याचे दिसून येत नसेल तर माझ्या पालकांकडून ती रक्कम वसूल करू नये, असे पुर्वाचे म्हणणे होते. मात्र या रकमेच्या भरण्यासाठी वारंवार पुर्वाला सूचना दिल्या जात होत्या. रक्कम चोरल्याचे गृहित धरून तिला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून पुर्वाने शनिवारी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेनंतर महाविद्यालय व्यवस्थापनाने पोलिसांना अथवा पालकांना न कळवताच परस्पर तिला रूग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचारसुरू केले. या प्रकाराबद्दल पुर्वाच्या पालकांनी तीव्र संताप व्यकत केला आहे.

Web Title: Suicide by jumping from students' college building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.