आत्महत्या की घातपात? : रक्षाबंधनाच्या दिवशी घटना उघडकीस आल्याने खळबळ

By admin | Published: August 18, 2016 11:34 PM2016-08-18T23:34:12+5:302016-08-18T23:34:12+5:30

मेहरुण तलावात गुरुवारी दुपारी दीड वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात याचा उलगडा झालेला नाही

Suicide Suicide? : A sensation caused by the incident on the day of Rakshabandhan | आत्महत्या की घातपात? : रक्षाबंधनाच्या दिवशी घटना उघडकीस आल्याने खळबळ

आत्महत्या की घातपात? : रक्षाबंधनाच्या दिवशी घटना उघडकीस आल्याने खळबळ

Next

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 18 : मेहरुण तलावात गुरुवारी दुपारी दीड वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात याचा उलगडा झालेला नाही, मात्र पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरुन तपास सुरु केला आहे. मृत तरुणाच्या हाताला राखी बांधलेली आहे, त्यामुळे रक्षाबंधन झाल्यानंतर ही घटना घडली की पूर्वीच राखी बांधण्यात आली होती, हे देखील एक कोडे आहे.

मेहरुण तलावात शेती शिवाराच्या दिशेने पाण्यात २१ ते ३० वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती घटनास्थळावरुन एका व्यक्तीने रामानंद नगर पोलिसांना दिली होती, मात्र ही हद्द एमआयडीसी पोलिसांची असल्याने तेथील ठाणे अंमलदाराने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी सहकाऱ्यांना सोबत घेवून घटनास्थळ गाठले.

तरुणाचे कपडे व चप्पल तलावाच्या बाहेरच
तरुणाचे कपडे व चप्पल तलावाच्या बाहेरच पडलेले होते. बनियन व अंडरवियरवर त्याने घातलेली होती. बागुल यांनी मृतदेहाची ओळख पटावी म्हणून परिसरात चौकशी केली नंतर हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.

हरविलेल्या गुन्ह्यांची चौकशी
दोन दिवसापूर्वीच एमआयडीसी पोलीस स्टेशनला एका तरुणाची हरविल्याची तक्रार दाखल झाली आहे. हा तरुण तोच आहे का? याची चौकशी केली जात आहे. तरुणाच्या हातावर राखी असल्याने नेमकी ही घटना आजच घडली की पूर्वीच घडली आहे, याचाही उलगडा झालेला नाही. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शिवाजी पुतळ्याजवळ आढळला मृतदेह
शिवाजी पुतळ्याजवळ रस्त्याला लागूनच आणखी एका ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह गुरुवारी दुपारी चार वाजता आढळून आला. संतोषकुमार श्रीमल बोहरा (रा.चोपडा) यांच्या माहितीवरुन शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Suicide Suicide? : A sensation caused by the incident on the day of Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.