उदयोजकाची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Published: July 21, 2016 06:40 PM2016-07-21T18:40:22+5:302016-07-21T18:40:22+5:30

एका उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेपूर्वी रामानंदनगर रिक्षा स्टॉप परिसरात घडली. व्यावसायिकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

Suicide by taking Udayojka's assault | उदयोजकाची गळफास घेऊन आत्महत्या

उदयोजकाची गळफास घेऊन आत्महत्या

Next

रामानंदनगरातील घटना : नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय
जळगाव : एका उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेपूर्वी रामानंदनगर रिक्षा स्टॉप परिसरात घडली. व्यावसायिकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भूपेंद्र दत्तात्रय पाटील (वय ४०, रा.रामानंदनगर, जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या उद्योजकाचे नाव आहे. रामानंदननगर रिक्षा स्टॉप परिसरात दत्त मंदिराजवळ प्लॉट क्रमांक २० मध्ये भूपेंद्र पाटील यांचे दुमजली घर आहे. घराच्या वरच्या मजल्यावर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना घडली तेव्हा; त्यांची पत्नी, आई-वडील व तीन मुले खालच्या मजल्यावर होते. भूपेंद्र पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. घटना उघडकीस आल्यानंतर पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

प्लास्टिक पाइप निर्मितीचा उद्योग

सुसरी, ता.भुसावळ हे भूपेंद्र पाटील यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील दत्तात्रय पाटील हे वनविभागात नोकरीला होते. त्यामुळे ते गेल्या अनेक वर्षांपासून जळगावात स्थायिक झालेले आहेत. काही दिवसांपूर्वीच दत्तात्रय पाटील हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ते रामानंदनगरात मुलाकडे राहत होते. भूपेंद्र पाटील हे एकटे होते. त्यांना दोन विवाहित बहिणी असून एक बहीण नाशिकला तर दुसरी पुण्याला राहते. पाटील हे उद्योजक होते. त्यांच्या एमआयडीसीत ‘बी सेक्टर’मध्ये (प्लॉट क्रमांक ३२) समृद्धी अ‍ॅग्रो प्लास्ट नावाच्या दोन कंपन्या आहेत.

नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय

भूपेंद्र पाटील यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. कंपन्यामुळे त्यांच्यावर आर्थिक देणे वाढले होते. त्यामुळेच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला असावा, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, समृद्धी (१३) व अर्पिता (२) या दोन मुली, ऐश्वर्य (१०) व आई-वडील असा परिवार आहे.

Web Title: Suicide by taking Udayojka's assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.