तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: August 25, 2015 02:27 AM2015-08-25T02:27:40+5:302015-08-25T02:27:40+5:30

दुष्काळाने त्रस्त झालेल्या आणखी तीन शेतकऱ्यांनी स्वत:चे जीवन संपविले. यात एका महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे.

Suicide of Three Farmers | तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next

बीड/जालना : दुष्काळाने त्रस्त झालेल्या आणखी तीन शेतकऱ्यांनी स्वत:चे जीवन संपविले. यात एका महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे.
शिरूर कासार तालुक्यातील खोलेवाडी येथील दादासाहेब सर्जेराव खोले (३५) यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे १० जनावरे आहेत. चारा संपला, तो घेणे मुश्कील बनले होते.
दुसरी घटना केज तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली. संतोष आत्माराम थोरात (२७) याने नापिकीला कंटाळून रविवारी पहाटे राहत्या घरी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला पाच एकर जमीन होती. त्यापैकी दोन एकरांवर खरीप पिकाची पेरणी झाली होती. ही पिके पूर्णपणे जळून गेली होती.
भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे घडली. कमल सुभाष वाघ (४५) महिला शेतकऱ्याने विहिरात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. त्यांना दीड एकर कोरडवाहू शेती असून, त्यांचा पती सुभाष हे भोळसर असल्याने त्याच शेती करीत होत्या. त्यांना तीन मुली असून, छोट्या मुलीच्या विवाहासाठी कमल यांनी बँकेकडून ५० हजार रुपये आणि सोसायटीकडून २५ हजार रुपयांचे कर्ज काढले होते.

Web Title: Suicide of Three Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.